व्यापारी पैसा फंड संस्थेला विकासासाठी सहकार्य करणार: सदानंद भागवत

संगमेश्‍वर: सामाजिक आणि शैक्षणिक हित लक्षात घेवून १९२९ साली स्थापन झालेल्या व्यापारी पैसा फंड संस्थेने संगमेश्‍वर पंचक्रोशीसाठी केलेले योगदान अभिनंदनीय आहे. यामुळे या संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपण सदैव तयार असल्याचे प्रतिपादन देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले. या शैक्षणिक संस्थेने विविध प्रकारे त्याग करत शैक्षणिक कार्य चालू ठेवल्याने आता या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे त्याबद्दलही त्यांनी संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. व्यापारी पैसा फंड संस्था व पैसा फंड इंग्लिश स्कूलच्यावतीने नुकताच १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर नारकर, उपाध्यक्ष अभय गद्रे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य अनिल शेट्ये, जगदीश शेट्ये, संस्था हितचिंतक संदीप सुर्वे, रमेश झगडे, व्यापारी संघ संगमेश्‍वरचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे, सुशांत कोळवणकर, अनिल भिडे, जितेंद्र प्रसादे, मुख्याध्यापक नेहा संसारे, पर्यवेक्षक सुभाष पाटील आदीजण उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देवून गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष पाटील यांनी केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button