रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पहिल्या ‘फॉरेन्सीक लॅब’चे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार

रत्नागिरी : किचकट गुन्हे प्रकरणात गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी बहुमुल्य भूमिका बजाविणार्‍या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या रत्नागिरीतील पहिल्याच फोरेन्सीक लॅब चे उदघाटन रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
अलिकडच्या काळामध्ये गुन्हेगारांकडून गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्या प्रवृत्तीना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालावर रासायनिक विश्‍लेषण करुन सामाजिक दृष्टीकोनातून तपास यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्वाची वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी अशा फॉरेन्सीक लॅब महत्वाची भूमिका बजावत असतात.
सद्यस्थितीत मुंबई येथे मुख्य प्रयोगशाळा असून नागपुर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर अशा ७ प्रयोगशाळा कार्यारत आहे. २४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार ठाणे, रत्नागिरी, चंद्रपुर, सोलापुर व धुळे या ५ लघु प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चंद्रपुर येथील प्रयोगशाळा सुरू झाली असून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठीची प्रयोगशाळा १६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या अगोदर या दोन्ही जिल्हयातील गुन्ह्यातील मुद्देमाल पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत होता. ही न्यायशाळा सुरू होताच विषशास्त्र व जिवशास्त्र विभागाच्या मुद्देमालाची तपासणी या ठिकाणी करणे शक्य होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button