पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारची केंद्राकडे ६८१३ कोटींची मागणी
मुंबईः राज्यात अनेक ठिकाणी आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून या उदध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ६८१३ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यापैकी कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी २१०५ कोटी तर कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०८ कोटींची मागणी केंद्राकडे मागण्यात आली आहे. यापैकी पिकांच्या नुकसानीसाठी २०८८ कोटी, सार्वजनिक आरोग्यासाठी ७५ कोटी, रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८७६ कोटी, तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी, जनावरांसाठी ३० कोटी, कोळी बांधवांसाठी ११ कोटी व स्वच्छतेसाठी ६६ ते ७० कोटी याशिवाय पाणी पुरवठा योजना दुरूस्तीसाठी १२५ कोटी, जलसंधारण कामासाठी १६८ कोटी, घराच्या नुकसानीसाठी २२२ कोटी, छोटे उद्योगधंदे आणि दुकानदारांच्या मदतीसाठी ३०० कोटी रुपये इतकी मदत द्यावी लागणार असल्याने त्यासाठी केंद्राकडून मदत मागण्यात आली आहे.