जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला खासदार शरद पवार व सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार नाहीत

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचा आज शुभारंभ होत आहे. राज्यात महापुराचे संकट आल्याने मदत वाटप सुरू असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरदराव पवार व सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख हे या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आयोजकाना कळविले आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर पूरग्रस्त दौऱ्यावर असल्यामुळे ते ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत,मात्र या सर्वांनी बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचा शुभारंभ हा सकाळी अकरा वाजता म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या शुभहस्ते होणार आहे.शुभारंभानंतर रत्नागिरी येथील सावरकर नाटय़गृहात बँकेच्या वतीने सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सहकार भूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button