आंबोली घाटमार्ग लवकर सुरळीत करा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे-परब यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.नुकसानग्रस्तांना मदत मिळावी तसेच आंबोली घाट रस्ता बंद असल्याने जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे.त्यामुळे आंबोलीतील वाहतूक सुरळीत सुरु व्हावी घाट मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशा विविध मागण्या अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना भेटून निवेदनाद्वारे केली.
www.konkantoday.com