रत्नागिरीत 22 सप्टेंबर ला माय लेकरू- my लेकरू स्पर्धा
रत्नागिरी :आई आणि मुलांचे नाते याला शब्द नसतात. पण आपल्या लेकराबद्दल, मुलाबद्दल आई ला काय वाटते हे व्यक्त होण्याची संधी रत्नागिरीतील वीरश्री च्यरिटेबल ट्रस्ट देणार आहे. पुढील महिन्यात 22 सप्टेंबर रोजी ‘माय लेकरू- my लेकरू’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी अस म्हटलं जातं आणि अर्थातच ते खरं आहे. आईच्या मायेची साय जगण्याचं बळ देते. तर अपत्य सुख हे आईसाठी स्वर्गसुखापेक्षाही मोठे असते. मात्र अनेकदा अनेक अडचणींमुळे एखादी स्त्री तिच्या आई होण्याच्या हक्कापासून वंचित राहते. अनेकदा शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक कारणे त्याला जबाबदार असतात. मात्र पाच वर्षांपूर्वी रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल निलेश शिंदे यांनी कोकणातील पाहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू केलं आणि अनेक महिलांना या मातृसुखाचा आनंद घेता आला. मातृसुख म्हणजे काय हे माऊलीला अधिक माहिती असतं. मात्र अनेकदा ती व्यक्त होऊ शकत नाही. याच तिच्या भावना मांडण्यासाठी वीरश्री ट्रस्ट तर्फे 22 सप्टेंबर रोजी ‘माय लेकरू- my लेकरू’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये आई, तिचं मुलं आणि इच्छा असल्यास वडील सुद्धा सहभागी होऊ शकतात. मुलाचे वय 12 वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे. यात आई आणि तीच लेकरू कोणतीही वेशभूषा करू शकतात, स्टेजवर आईला 1 मिनिटात तिच्या मुलाबद्दल आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. सहभागी स्पर्धकांमधील पहिल्या तिघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून 15 सप्टेंबर 2019 पर्यंत धनवंतरी रुगणालायत 02352-221282 किंवा 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणी फी 150 रुपये असून कार्यक्रमाच्या योग्य आयोजनासाठी ती घेतली जात आहे. यातील जमा रक्कम सामाजिक संस्थेला देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या लेकराबद्दलच्या भावना व्यक्त करा असे आवाहन असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ निलेश शिंदे आणि रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबीच्या सर्वेसर्वा डॉ तोरल निलेश शिंदे यांनी केले आहे.