रत्नागिरीतील खड्डयांच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष करणार अनोखे आंदोलन
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच शहरातील अन्य भागात मोठया प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.त्यामुळे शहरातून वाहतूक करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.नगर परिषद प्रशासनाकधुन अजूनही खड्डे बुजवण्यात आले नसल्याचे स्वाभिमान पक्षाचे म्हणणे आहे.त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शहरातील खड्डय़ांचे छायाचित्र प्रदर्शन भरवणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधार्यांनी याच मुख्य रस्त्यावरून शहराचा विकास आम्ही घेऊन येऊ अशी वलगना अडीच वर्षांपूर्वी केली होते.विकासाचं हे फसवं व्हिजन मांडणार्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सत्ताधार्यांच्या विकासाचं हे रूप छायाचित्रांच्या रूपाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शहरवासियांसमोर मांडणार आहे आणि शहरवासीयांच्या तीव्र भावनांना मोकळी वाट करून देणार आहे.यासाठीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातर्फे गुरूवार दि. १५ आॅगस्ट रोजी शहरातील हॉटेल विवेकच्या मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अनोखे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनि हे प्रदर्शन पहावे आणि आपली रत्नागिरी कशी असायला हवी याबाबतची प्रतिक्रिया नोंदवावी, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com