पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर तरी पूरग्रस्तांचे प्रश्न सुटणार का ?
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर आता रत्नागिरी दौर्यावर येत आहेत. १५ऑगस्ट रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वित्त हानीबाबत बैठक लावली आहे.राजापूर रत्नागिरी, चिपळूण व जिल्ह्याच्या अन्य भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून त्यातील आपदग्रस्तांना अद्यापही शासकीय मदत मिळत नसल्याच्या तक्रारी त्या भागातील आमदारच करीत आहेत.नुकसानीचे पंचनामेही होत नसल्याच्या तक्रारी आहेत.आता रत्नागिरीत येत असलेले पालकमंत्री याबाबत ठोस निर्णय घेऊन आपदग्रस्तांना दिलासा देणार का हा प्रश्न आहे.
www.konkantoday.com