
घेरापालगड येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू.
खेड तालुक्यातील घेरापालगड येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. धनाजी रामचंद्र मोरे यांच्या मालकीचा हा बैल होता. यामध्ये त्यांचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. घेरापालगड येथे बिबट्याचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेवून मुक्तपणे संचार करणार्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.www.konkantoday.com