
कोकण रेल्वे दुसर्या दिवशीही रखडतच सात रेल्वेगाड्या उशिराने धावल्या
कोकण मार्गावरून धावणार्या ७ रेल्वेगाड्या दुसर्या दिवशीही उशिराने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. १२२२४ क्रमांकाची एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस ५ तास तर १२९७७ क्रमांकाची मरूसागर एक्स्प्रेस ४ तास ५० मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
०९०५७ क्रमांकाची उधना-मंगळूर स्पेशल २ तास १० मिनिटे, तर १२१३४ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. १२४८४ क्रमांकाची कोच्युवेली एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटे तर १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास ४५ मिनिटे विलंबाने धावली. २२११४ क्रमांकाची कोच्युवेली-एलटीटी द्वि साप्ताहिक स्पेशलही १ तास २५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला.
www.konkantoday.com