गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची शास्त्रीय गायिका वैष्णवी जोशी आंतरराष्ट्रीय स्तरावर
रत्नागिरी :गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची शास्त्रीय गायिका वैष्णवी जोशी हिला मॉरिशस येथे निमंत्रित केले आहे. मॉरिशसच्या मराठी कल्चर सेंटरने मुंबई विद्यापीठाला निमंत्रित केले असून त्यामध्ये वैष्णवीसह २० विद्यार्थी जाणार असून ५ सप्टेंबर २०१९ रोजी मॉरिशस येथे होणार्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असून या कार्यक्रमाला मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे असणार आहेत.
वैष्णवी जोशी हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धेत शास्त्रीय आणि सुगम गायनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या प्रतिभावान गायिकेने आंतराष्ट्रीय स्तरावर गायनाची संधी मिळवली. वैष्णवी ही श्रीमती संगीता बापट यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे. ती विशारद पूर्ण आहे. मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे आणि रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्राध्यापक आनंद आंबेकर यांच्या समन्वयातून प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचेही तिला सहकार्य मिळत आहे. याशिवाय वैष्णवीचे वडिल धुंडीराज जोशी यांनी तिला वेळोवेळी प्रोत्साहन व पाठिंबा दिला. याशिवाय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्या प्रयत्नामुळे वैष्णवी जोशी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी पहिली गायिका विद्यार्थीनी ठरली आहे.
वैष्णवीचे प्राचार्य डॉॅ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय व उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक आनंद आंबेकर, प्राध्यापक श्रीकांत दुदगीकर, श्री. धुंडीराज जोशी, श्री. प्रसाद गवाणकर आदीजण उपस्थित होते. वैष्णवीच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतिश शेवडे, तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.