गणपतीपुळे विकास आराखड्याचे काम शिवसैनिकांनी थांबविले
श्रीक्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी शंभर कोटींचा निधी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असताना देखील प्रशासनाने त्यांना विश्वासात न घेता परस्पर कामाला सुरुवात केल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी हे काम थांबविले.रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य व सेनेचे तालुका संघटक गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कमानीचे काम थांबवण्यात आले.या मोठ्या कामाचा शुभारंभ आमदार उदय सामंत यांना व राज्याचे अर्थमंत्री मुनगुंटीवार यांना बोलावून करायला पाहिजे होता.परंतु तसे प्रशासनाने केले नाही. तसेच बांधण्यात येणारी कमान रस्त्याच्या रुंदीपेक्षा कमी आहे असे आक्षेप घेण्यात आले आहेत.आता आमदार उदय सामंत हे १६ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे येथे भेटून कामाची पाहणी करणार आहेत आणि तेथे अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com