
मदतीसाठी देण्यात येणार्या धान्याच्या पाकिटांवर प्रसिद्धीचे स्टिकर नको: आ. उदय सामंत यांनी अधिकार्यांना सुनावले
रत्नागिरी:पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात अतिवृष्टी व पुरामुळे अनेक गावांना व त्यातील कुुटुंबाना फटका बसला आहे. रत्नागिरी तालुक्यात गरजू पुरग्रस्तांपर्यंत मालमत्तेचा पंचनामा व शेतीच्या नुकसानीसाठी कृषी पंचनामा करण्यासाठी सर्कल फिरकलेले नव्हते, असा आरोप आ. उदय सामंत यांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करून हे वाटप सुरू केले होते. रत्नागिरी तालुक्यात जे शासनाने पुरग्रस्तांना धान्य वाटपाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत त्यावर कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धी करणारे स्टिकर लावलेले चालणार नाहीत असे सामंत यांनी संबंधित अधिकार्यांना सुनावले. ज्या कुणाला प्रसिद्धीची हौस असेल त्यांनी ही परिस्थिती मुळ पदावर आल्यानंतर त्यांना पाहिजे असलेली प्रसिद्धी करावी. मुळात तातडीने ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना वेळेत धान्य व अन्य मदत देण्यात यावी असेही सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com