
नादुरूस्त झालेले वीज मीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत महापुरामुळे नादुरूस्त झालेले वीज मीटर स्वखर्चाने बदलण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. आता पूर ओसरताच सर्व भागातील वीज मीटर दुरूस्तीचे काम महावितरणच्यावतीने करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून अनेक भागात वीज पुरवठा बंद करण्यात आला होता तर काही ठिकाणी पडझडीमुळे वीज खंडीत होण्याचे प्रकार झाले होते. तरीदेखील महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी युद्धपातळीवर काम करून सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी ग्राहकांनी देखील संयम बाळगून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com