डिजिटल वॉलेटचा रत्नागिरी जिल्ह्यातील ५४ जणांनी घेतला फायदा
महावितरणने वीज ग्राहकांना बँक , पोस्टात किंवा कार्यालयात जाऊन बिल भरण्याएवजी डिजिटल वॉलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ ५४ लोकांनी घेतला आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या या डिजिटल वॉलेटमुळे छोट्या व्यापाऱ्यांना देखील आर्थिक कमाई करायची संधी उपलब्ध झाली आहे. छोटे उद्योजक,जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकान व वीज बिल्स करणाऱ्या एजन्सीला ही बिले स्वीकारल्यानंतर कमिशनद्वारे उत्पन्न मिळवता येणार आहे. या वॉलेट योजनेचा चिपळूण विभागात१०, रत्नागिरी विभागात २७,तर खेड विभागात८ लोकांनी फायदा घेतला आहे.
www.konkantoday.com