प्रद्युम्न माने, प्रसाद सावंत यांनी घेतली कोत्रेवाडी ग्रामस्थांची उपोषण स्थळी भेट

लांजा : नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंड विरोधात गेले ७८ दिवस उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आणि युवासेना राज्य सहसचिव प्रद्द्युम्न माने यांनी लांजा दौऱ्यादरम्यान भेट घेतली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश करंबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, युवासेना लांजा तालुका युवाधिकारी अभिजीत शिर्के, महिला लांजा शहर संघटक सिया लोध उपस्थित होते.
“शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत आपल्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत. या विषया संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा बैठक बोलवली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा वेळ पडल्यास आपण युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातूनही हा लढा अधिक तीव्र कसा करता येईल ते पाहु,” असे आश्वासन युवासेना सहसचिव प्रद्द्युम्न माने यांनी दिले.
“माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या सोबत सुरवाती पासून आहे. मी ही अनेक बैठकींना उपस्थित होतो. युवासेनेकडून जे जे सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे ते ते सहकार्य आमच्याकडून तुम्हाला मिळेल,” असे आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी यावेळी दिले.
“आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे प्रशासनाला माहीत आहे; मात्र ह्यामध्ये काही जणांचे हात अडकलेत, काही अधिकारी कायमचे घरी बसतील, तर काही जणांचे खरे चेहरे बाहेर पडतील या भीतीने प्रशासन हतभल आहे; परंतु तुमची एकजुट पाहता प्रशासनाला तुम्हाला न्याय हा द्यावाच लागेल, तुमच्या लढ्यात आम्ही शेवट पर्यंत असू,” असा शब्दही प्रसाद सावंत यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिला.
लांजा नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला ७८ दिवस झाले असताना अद्यापही हे ग्रामस्थ निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button