
लहान भावानेच मोठय़ा भावाचे पैसे चोरले
मोठ्या भावाने घरात कपाटात ठेवलेले पैसे लहान भावाने लांबवण्याचा प्रकार दापोलीत घडला आहे. वणंद येथील राहणाऱ्या निखिल चाेगले याने आपला लहान भाऊ नितीन याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.दापोली तालुक्यातील वणंद येथे राहणारा निखिल चौगले याने आपल्या कामासाठी बँकेतून एके चाळीस हजार रुपये काढले होते.ते त्याने आणून घराच्या कपाटात ठेवले होते. त्यानंतर तो कामावर निघून गेला होता. घरात परत आल्यावर घरातील कपाट लॉकर फोडलेला दिसला व त्यातील रक्कमही गायब झालेली दिसली. त्या दिवसापासून त्यांचा लहान भाऊ नितीन हाही घरातून निघून गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या विरोधात पैसे पळवल्याची तक्रार निखिल याने पोलिसात केली आहे.
www.konkantoday.com