
उभ्या असलेल्या कंटेनरला कारचालकाने धडक दिल्याने एकजण जखमी
उभ्या असलेल्या कंटेनरला कार चालकाने पाठीमागून जोरात धडक देवून अपघात केल्याची घटना गुरूवारी मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे घडली. यात कारचालक जखमी झाला असून या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण कमलाकर शेट्ये (मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद अमरेंद्रकुमार बाबूलाल यादव (२६, उत्तरप्रदेश) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास अमरेंद्रकुमार यादव कंटेनर घेवून रत्नागिरी गद्रे मरीन कंपनी येथून येत होता. तो कामथे येथील द्वारका हॉटेल परिसरात असलेल्या एका मुलाच्या पाठिमागे रस्त्याच्या डाव्या बाजूला कंटेनर लावून ते टॉयलेटसाठी गेला होता. त्याचदरम्यान सावर्डेहून चिपळूणकडे जाणारा कारचालक किरण शेट्ये याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठिमागून जोराची धडक दिली. www.konkantoday.com