बस व टँकरचा पेण खोपोली मार्गावर अपघात,२ ठार २० जखमी

खोपोलीकडून पेणकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गागोदेजवळ समोरून येणाऱ्या टँकरने रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २ ठार तर २० जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पेण खोपोली मार्गावर गागोदे गावाजवळील फाटा येथे एसटी बस आणि गॅस वाहून नेणारा टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात समोरुन येणाऱ्या गॅस वाहून नेणाऱ्या टॅंकर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने झाला असून एसटी बस चालकाच्या दिशेने हा टॅंकर घासत जाऊन उलटल्याने हा अपघात झाला आहे. या बसचा क्रमांक (एमएच-२० -बीएल-०५४७) असा आहे हि बस खोपोली येथुन पेणकडे जात होती.टँकरचा (एमएच-०८-एच-२८३२) असा नंबर आहे. या अपघातात एसटीतील प्रवासी रघुनाथ बाळाराम म्हात्रे(वय ५०) दिनेश खेडेकर(वय २६) या दोघांचा मृत्यू झाला.जखमी प्रवाशांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी ८ गंभीर जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.पेण येथील खासगी रुग्णालयात १० जखमी रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button