पद्मश्री तलयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार तबला, पखवाज, संवादिनी कार्यशाळा संवादिनीसाठी श्री. अनंत जोशी मार्गदर्शक

दिनांक 14 आणि 15 जून या दोन दिवसांमध्ये तबला व पखवाज प्रशिक्षण आणि संवादिनी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तलायोगी पंडित सुरेश तळवलकर या संपूर्ण कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत तर संवादिनीचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि अत्यंत कल्पक कलाकार श्री. अनंत जोशी करणार आहेत. संस्थेचे उपक्रम फक्त आयोजनापुरते मर्यादित न राहता रत्नागिरीतल्या गुणी कलाकारांना तपस्वी कलाकारांचं मोलाचं मार्गदर्शन मिळावं या हेतूने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

नृत्य, गायन आणि वादन या तीनही प्रकारांमध्ये ताल हा आत्मा असतो. तालाचं विशुद्ध ज्ञान हा संगीत सादरीकरणाला वेगळीच उंची आणि दर्जा प्राप्त करून देत असतो. मैफिलीचा तोल सांभाळणारा हा ताल अंगात मुरावा लागतो, त्यासाठी अपार अविश्रांत रियाज, मेहनत करावी लागते. प्रत्येक कलाकार ही मेहनत घेत असतो. अशा मेहनतीला योग्य दिशा देण्याचं, विचार देण्याचं काम पंडित सुरेश तळवलकर यांच्यासारखे अध्वर्यू करत असतात. संवादिनी हे संगीत मैफिलीतील अत्यंत महत्वाचं आणि उपजत सुरेल वाद्य. परंतु साथसंगत आणि एकल अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवायचं असेल तर मात्र कलेबरोबरच कौशल्यही आत्मसात करावं लागतं. त्यासाठी संबवादिनीची ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल.

या दोन्ही कलाकारांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा रत्नागिरीतील सर्व कलाकारांना मिळावा म्हणून ही कार्यशाळा हे आर्ट सर्कलचे महत्वाचे पाऊल आहे.

*कार्यशाळेबद्दलची आवश्यक माहिती:

1. सुरुवात: दिनांक 14 जून शनिवार दुपार 3.00 पासून रविवार 14 जून संध्याकाळ 6.00 पर्यंत

2. ठिकाण: सिद्धिविनायक मंगल कार्यालय, शिवाजीनगर

3. शुल्क: तबला-पखवाज कार्यशाळा: रुपये 1500/संवादिनी कार्यशाळा: रु. 1000/

4. याच शुल्कामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना नाश्ता व जेवण देण्यात येईल.

5. बाहेरगावच्या शिबिरार्थींची राहण्याची सोय करायची असल्यास संस्थेशी संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक: आर्ट सर्कल* रत्नागिरी: 86690 82727*चैतन्य पटवर्धन:* 8552899444 (संवादिनी)*हेरंब जोगळेकर*: 9422630660 (तबला पखवाज)—– आर्ट सर्कल फाउंडेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button