कोडजाई नदीवर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
दापोली शिर्दे सडवली कोळबांद्रे मार्गावर कोडजाई नदीवर बांधलेल्या फरशीला तडे गेले असून मोठी पर्जन्यवृष्टी झाली तर नदीला येणाऱ्या पावसाच्या पुरामुळे हि फरशी वाहून जाऊन पंचक्रोशीचा सपंर्क तुटला जाऊन प्रवाशी जनतेला अनेक संकटाना सामोरे जावे लागेल त्यासाठी तडे गेलेल्या फरशीचे सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुगी करून याठिकाणी पूल बांधण्याची तजवीज करावी अशी मागणी प्रवाशी जनतेकडून पुढे येत आहे
जालगाव साखारोली मार्गाच्या बरोबर मधील टप्पा म्हणून दापोली कोळबांद्रे या रस्त्याची ओळख आहे,याच रस्त्याच्या मध्यभागी कोडजाई नदी वाहते, पावसामध्ये या नदीवर बांधलेल्या फरशी वरून नेहमीच पाणी वाहत असते,हा मार्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यात असताना जिल्हा परिषदेने या ठिकाणी फरशी चे बांधकाम करायला सुरवात केली होती तेव्हा स्थानिक ग्रामस्थानी विरोध केला होता,नदीचे पाणी फरशी पेलू शकणार नाही येथे मोठ्या पुलाची गरज आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे होते तरी देखील आपल्याच निर्णयावर ठाम राहत जिल्हापरिषदेने ग्रामस्थांचे न ऐकता फरशीचे बांधकाम पुढे रेटत या ठिकाणी फरशीचे बांधकाम पूर्ण केले आणि तेव्हापासून पंचक्रोशीतील ग्रामस्थ पावसाळ्यामध्ये या नदीवर असलेल्या फरशीवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे ना त्यांना एस टी प्रवास करता येत ना त्यांना रोजी रोटी कमवता येत,दापोली मधून बेजेवाडीकडे जाणारी बस फरशीच्या पाण्यामुळे सडवलीमधूनच परत फिरते,नदीचे पाणी ओसरत नाही तो पर्यंत दापोलीतून बेजेवाडी कडे जाणारे प्रवाशी बसमध्येच अडकून पडतात,आता तर या फरशीला मोठं मोठे तडे गेले असून मोठी पर्जन्यवृष्टी झाली तर नदीला येणाऱ्या पावसाच्या पुरामुळे हि फरशी वाहून जाऊन पंचक्रोशीचा सपंर्क तुटला जाऊन प्रवाशी जनतेला अनेक संकटाना सामोरे जावे लागेल त्यासाठी तडे गेलेल्या फरशीचे सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुगी करून याठिकाणी पूल बांधण्याची तजवीज करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
www.konkantoday.com