आपले नगराध्यक्षपद काढून घेण्यासाठी राजकीय षडयंत्र
रत्नागिरी ः माझे नगराध्यक्षपद काहींना अडचणीचे वाटत आहे. त्यामुळे मला तीन महिने आत ठेवून नगराध्यक्षपद काढून घ्यायचे आणि आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा असे षडयंत्र काहीजणांनी आखले होते, असा आरोप मनसेचे नेते व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. खेडेकर यांनी याबाबत कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख आ. रामदासभाई कदम यांचेकडे असल्याचे बोलले जाते. खेड आंदोलन प्रकरणी त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. यानंतरही आपण जनतेच्या हितासाठी काम करणार असेही खेडेकर यांनी सांगितले.