
१० वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून अंतर्गत गुण देण्याचा निर्णय
रत्नागिरी ः या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून १० वीच्या भाषा व सामाजिक शास्त्र या अंतर्गत गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. यामुळे यंदापासून पुन्हा एकदा एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना २० गुण तोंडी परीक्षेचे आणि ८० गुण लेखी परीक्षेचे राहणार आहेत. गेल्या वेळी शाळेतून देण्यात येणारे हे गुण रद्द करण्यात आल्यामुळे दहावीचा निकाल कमी लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती. आता शासनाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
www.konkantoday.com