हिरकणी स्पर्धेत नाचणे येथील श्री साई समर्थ बचत गटाची निवड
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत हिरकणी नवा उद्योग महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर दहा गटांची निवड झाली असून त्यामध्ये नाचणे गावातील श्री साई समर्थ स्वयम सहाय्यता बचत गटाची निवड झाली आहे.या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील १५२ बचत गटांनी भाग घेतला होता.ही स्पर्धा बचत गटांना आपापल्या व्यवसायात उद्योग विस्तार करण्याकरिता नवीन कल्पना याविषयी प्रेझेंटेशन तयार करून सादरीकरण कमिटीसमोर करावयाचे होते. या कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार असुन गटविकास अधिकारी व इतर तीन जणांच्या कमिटीने परीक्षण केले .आता पुढील स्पर्धा जिल्हास्तरावर होणार आहे. श्री साई समर्थ स्वयम सहाय्यता बचत गट सामाजिक कार्यकर्ते संतोषजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे काम करीत आहे. या बचत गटामार्फत नाचणे येथे तयार होणारे बटाटेवडे व अन्य खाद्यपदार्थांची ग्राहकांना भुरळ पडली आहे.या बचत गटांमार्फत नुकतीच फिरती खाद्यपदार्थांची व्हॅन तयार करण्यात आली असून ही व्हॅन जेके फाइल्स समोर उभी करून त्यावर चटकदार खाद्यपदार्थ बचत गटाच्या महिला बनवत असतात. स्वच्छता व टापटीप हे या बचतगटाचे वैशिष्ट आहे. हा बचत गट नेहमी नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी करीत असतो संतोषजी सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे या भागातील अनेक महिलांना बचत गटाच्या रूपाने रोजगार प्राप्त झाला आहे.या बचत गटांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com