लोटे औद्योगिक वसाहतीतील पाणी आजुबाजूच्या नाल्यांमध्ये
खेड: लोटे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्याचे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील पाणी आजुबाजूच्या नाल्यात जावून नाल्याचे पाणी दुषित होण्याचा प्रकार घडला आहे. लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाबाबत आजुबाजूच्या गावांना नेहमी या प्रकाराला तोंड द्यावे लागते. या कारखान्यातील पाणी आजुबाजूच्या खाडीमध्ये सोडण्यात आल्याने अनेक वेळेला मासे मरण्याचे प्रकारही घडत असतात. आता एमआयडीसीचा चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने हे सांडपाणी नाल्यामध्ये वाहत असल्याचे दिसल्यावर लोटेचे शिवसेना शाखाप्रमुख सचिन काते यांनी ही बाब तत्काळ सीपीटीचे संचालकांना कळविली. अनेकवेळा नागरिकांनी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्यात नाराजी आहे.
www.konkantoday.com