
डॉ. शरद प्रभूदेसाई अनुवादीत दास्यातून मुक्तीचे उद्या प्रकाशन
रत्नागिरी ः कृष्णवर्णीयांचे नेते बुकर टी वॉशिंग्टन यांच्या आत्मचरित्राचा रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉ. शरद प्रभूदेसाई यांनी मराठीत अनुवाद केला असून डायमंड प्रकाशनाने हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जनसेवा ग्रंथालयातर्फे लक्ष्मी सभागृह रत्नागिरी येथे रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील साहित्यिक डॉ. दिलीप पाखरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
www.konkantoday.com