छोट्या मुलीवर अत्याचार करणार्‍या शिक्षकाला दहा वर्षाची सक्तमजुरी

राजापूर : राजापूर तालुक्यातील एका शिक्षकाने आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला होता. त्याप्रकरणी आरोपी मंगेश उर्फ बंड्या महादेव राऊत या शिक्षकाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दहा वर्ष सक्त मजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्र्रकार १६ जून १८ रोजी राजापूर तालुक्यात घडला होता. राजापूर तालुक्यातील या कुटुंबाकडे शिक्षकाचे येणेजाणे होते. १६ जून रोजी त्याने पिडीत मुलीची आई व भाऊ घरात जेवत असतानाच सदर मुलीला पडवीत नेवून तिच्यावर अत्याचार केला होता. मुलीच्या आईला हा प्रकार कळल्यानंतर त्यानी आरोपीविरूद्ध फिर्याद दाखल केली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button