
खेडशी येथे तरुणीचा मृतदेह सापडला ,खुनाचा प्रकार असण्याची शक्यता ?
रत्नागिरी : शेळ्या चरण्यासाठी रानात गेलेल्या खेडशी -चिंचवाडीतील मैथिली प्रवीण गवाणकर या तरुणीचा मृतदेह रानातील एका बांधावर आढळून आला आहे.तिच्या चेहऱ्यावर दुखापती असून तिचा मृत्यू हा खुनाचा प्रकार आहे की घातपाताचा याविषयी पोलीस चौकशी करीत आहेत.
खेडशी चिंचवाडी येथील १७ वर्षीय मैथिली ही अकरावीत शिकत होती. तिचे वडील मोलमजुरी करतात. तिची आई घरीच असते तर तिला एक लहान भाऊ आहे. शुक्रवारी सायंकाळी ती जवळच्याच रानात शेळ्या चरण्यासाठी गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तिचा मृतदेह रानातील बांधावर आढळून आला.या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन अधिक तपास सुरू केला आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमा असल्याने हा खुनाचा प्रकार आहे का याची पोलीस चौकशी करीत आहेत. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मैथिली हिच्यावर एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केला असावा का या दृष्टीनेही शोध घेण्यात येत आहे.
www.konkantoday.com