कोकण रेल्वे मार्गावर गाड्या उशिराने,वेळापत्रक कोलमडले

कोकणात व मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.पावसामुळे खास करून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सतत कोलमडत होती.काही अपवाद वगळता कोकण रेल्वेवरील वाहतूक सुरळीत होती.परंतु पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले आहे. पावसामुळे शुक्रवारी मुंबई- मडगावदरम्यान रेल्वे गाड्या १ ते ६ तास उशिराने धावत धावत होत्या.लांब पल्ल्याच्या गाड्या २ ते ३० तास उशिराने धावत होत्या. मुंबईच्या दिशेने जाणारी १२४८३ कोचुवेली एक्स्प्रेस ३०.१४ तास, २२११४ कोचुवेली एक्स्प्रेस १२.४५ तास, तर गरीबरथ एक्स्प्रेस ९.१८ तास उशिराने धावत होती.नेत्रावती ६.१३, तेजस एक्स्प्रेस २.०६, राजधानी एक्स्प्रेस ३.४१, मांडवी एक्स्प्रेस १.४० तास उशिराने धावत होत्या.मुंबईहून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रकही बिघडले आहे. मडगावच्या दिशेने जाणारी मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेस ८.२६ तास, जनशताब्दी एक्स्प्रेस १.०३ तास, १९२६६ कोचुवेली एक्स्प्रेस ३३ मिनिटे, १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस १ तास, १०१०३ मांडवी एक्स्प्रेस ५.१६ तास उशिराने धावत होत्या.
वाहतुक सुरळीत होण्यासाठी अजून एक आठवडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button