
जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले.
अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावली. आपले जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले.थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत