जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांचे आदेश
रत्नागिरी ः जिल्ह्यात पुरग्रस्त व अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर साथी पसरल्या असून जिल्हा आरोग्य विभागामार्फत त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात देखील रूग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच रहावे असे आदेश प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा देण्यात आला असून नागरिकांनी निर्जंतुक करून पाणी वापरावे तसेच घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com