सांगवे गावातील १४७ कुटूंबांनी उभारले शोषखड्डे सांगवे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व कुटूंबांनी शोषखड्डयाचे काम पूर्ण केले आहे. ही बाब कौतुकास्पद असून जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनीही सांगवे गावाकडून प्रेरणा घ्यावी. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रयत्नानेच गावात १००% शोषखड्डे उभारण्यात आले. त्यामुळे अन्य गावच्या सरपंचांनी आणि तिथल्या ग्रामरोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. विशेष करून श्रमदानातून हे शोषखड्डे उभारले आहेत. १०० टक्के शोषखड्ड्यांचे काम पूर्ण केल्यानंतर आज अधिकारी वर्गाने पाहणी दौरा केला. जि. प. मुख्य अधिकारी डॉ. इंदराणी जाखड़, संगमेश्वरचे सभापती जया माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, माजी सभापती सारीका जाधव, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर, कार्यकारी अभियंता श्री. परवडी, सरपंच देवदत्त शेलार, पाणी व स्वच्छता विभागाचे सर्जेराव पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.या पाहणी दौऱ्या दरम्यान त्या पुढे म्हणाल्या की आम्ही रत्नागिरीतच कार्यक्रम करण्याचे निश्चित केले होते. पण ग्रामस्थांनी आग्रह केल्यामुळे कार्यक्रम गावातच करण्याचे ठरले आणि एक गोष्ट चांगली झाली. आज गावात आल्यानंतर गावात कार्यक्रम करण्याचा निर्णय चांगला होता. इथल्या ग्रामरोजगार सेवकांनी मेहनत घेतल्यामुळे शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले. सांगवे गावाचे उदाहरण घेऊन इतर ग्रामपंचायतींनी शोषखड्डे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.तसेच शोषखड्यांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी शोषखड्डे उभारताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. श्रमदानातून उभारल्यामुळे अधिक अडचण आली नाही. आता सांडपाणी दुसऱ्यांच्या जागेत जात नाही. त्यामुळे वादविवाद टाळता येतात. त्याच प्रमाणे आमचा गाव हा डास-मुक्त गाव आहे. त्यामुळे डासांमुळे होणारे आजार ही आत्ता टाळता येतील.असे ग्रामस्थांनी सांगितले.