एसटी कंटेनरच्या अपघातात तेरा शाळकरी मुले जखमी
मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे झालेल्या एसटी व कंटेनर अपघातात एसटीतील तेरा शाळकरी विद्यार्थी जखमी झाले होते. त्यातील काही जणांना उपचार करून सोडण्यात आले तर सात जणांवर चिपळूण येथील लाईफकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. खेड तालुक्यातील वावे नातू येथे बस वस्तीला होती. या बसमध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी प्रवास करीत होते. ही बस कळंबस्ते येथे आली असता मागून आलेल्या कंटेनरने बसला धडक दिल्याने अपघात झाला.
www.konkantoday.com