इव्हीएम मशिनच्या विरोधात चिपळुणात कॉंग्रेसची सह्यांची मोहीम
चिपळूण ः इव्हीएम आणि व्हीपी पॅडसारख्या संशय निर्माण करणार्या निवडणूक प्रक्रियेला जगातील बहुसंख्य लोकशाही राष्ट्रांनी नाकारले असतानाच भारतात मात्र ही प्रक्रिया सुरू आहे. भारताने पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेचा मार्ग अवलंबावा या मागणीसाठी चिपळूण शहरात कॉंग्रेसतर्फे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कॉंग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम, प्रकाश साळवी, सुरेश काकतकर आदींनी या मोहिमेत भाग घेतला असून २१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार्या सर्व पक्षीय आंदोलनात सहभागी होण्याचेही ठरविण्यात आले आहे.
www.konkantoday.com