आंबोली घाटात पुन्हा दरड कोसळली

सिंधुदुर्गात गेले काही दिवस जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुरग्रस्त स्थिती असून आंबोली घाट मार्ग ही अतिशय धोकादायक बनला आहे. मंगळवारी ( ता. ६ ) आंबोलीपासून तीन किमीवर घाटमार्गात मुख्य धबधबा अलिकडेच मोठी दरड दोन वेळा कोसळली. तर त्याच दिवशी याच घाटमार्गात वेगवेगळ्या आठ ठिकाणी मोठी झाडे, दगड व माती कोसळली होती. तर बुधवारी ( ता. ७ ) रात्री मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर पुन्हा दरड कोसळल्याने आंबोली घाट मार्ग ठप्प झाला आहे. तसेच पाऊस असाच राहिल्यास संपूर्ण आंबोली घाटात ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या स्थितीत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button