स्किल इंडियामध्ये रत्नागिरी जिल्ह्याची निवड
रत्नागिरी ः जिल्ह्याचा कौशल्यविकास आराखडा करण्याबाबत केंद्र सरकारने प्रस्ताव मागितले होते. यामध्ये दिल्लीमध्ये कौशल्य विकास मंत्रालयासमोर प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये देशातील २२५ जिल्ह्यांनी प्रकल्प सादर केले होते. त्यातील २५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी व कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याने सादर केलेल्या या प्रस्तावात पर्यटन क्षेत्रात रोजगार देण्याची क्षमता असल्याने या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्र्रमांवर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच मत्स्य व शेती फळ प्रक्र्रियेतील संबंधित प्रशिक्षणालाही प्राधान्य देण्यात आला आहे. स्किल इंडिया योजनेत रत्नागिरीची निवड झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा निधी मिळणार असून त्यातून ३६ प्रशिक्षण संस्थांमार्फत ३ हजार तरूणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्किल इंडिया योजनेमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी म्हटले असून या योजनेची अंमलबजावणी या महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com