शासकीय जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात दुरूस्ती करुनही लागली गळती
रत्नागिरी ः निरनिराळ्या शासकीय इमारतींवर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी दुरूस्तीवर खर्च केला जातो. हा निधी योग्य रितीने खर्च केला जातो का? अशी शंका निर्माण होणारे प्रकार घडत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयाचा शस्त्रक्रिया विभाग अनेक दिवस डागडुजी करण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या डागडुजीवर निधी खर्च करून दीड महिन्यापूर्वी हा विभाग रूग्णांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या दुरूस्तीचे पितळ उघडे पडले असून शस्त्रक्रिया विभागात चक्क गळती सुरू झाल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रियाही रद्द करण्याचा प्रकार नुकताच जिल्हा रूग्णालयात घडला आहे. गळतीमुळे शस्त्रक्रिया होणार नसल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात आल्याने त्यांना वाट पाहण्याखेरीज गत्यंतर नाही. जिल्हा रूग्णालय हे सामान्य रूग्णांसाठी असल्यामुळे रूग्ण याबाबत आवाजही उठवू शकत नाहीत.
www.konkantoday.com