लोकशाही दिनात गैरहजर राहणार्या अधिकार्यांवर कडक कारवाईचा इशारा
रत्नागिरी ः नागरिकांना आपले थेट प्रश्न नागरिकांना जिल्हाधिकार्यांकडे मांडता यावेत व त्या प्रश्नाबाबत त्यांना लगेच न्याय मिळावा यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळी सर्व खात्याच्या सर्व विभागांच्या अधिकार्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असताना काही खात्याचे अधिकारी लोकशाही दिनाच्यावेळी गैरहजर राहतात. आता यापुढे लोकशाही दिनाला अशा गैरहजर राहणार्या अधिकार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.
लोकशाही दिनात विविध खात्याच्या तक्रारी लोकं करीत असतात त्यावेळी त्या खात्याचे संबंधित अधिकारी समोर असणे गरजेचे असते. मात्र असे असूनही या लोकशाही दिनाचे गांभीर्य न पाहता अनेक अधिकारी वारंवार अनुपस्थित रहात असतात. मात्र आता अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com