धोक्याच्या पातळीच्या ब्ल्यू व रेड लाईन मारण्याचा निर्णय

रत्नागिरी ः जिल्ह्यातील पुरस्थितीमुळे नद्यांच्या धोक्याची पातळी कळावी व त्याचा इशारा देणार्‍या ब्ल्यू व रेड लाईन मारण्याच्या नोटीसा देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरस्थितीचा विचार न करता बांधकामे करून लोक घरे बांधत आहेत व त्यात रहात आहेत. रत्नागिरी तालुक्यात अनेक नदीकाठच्या भागातील गावांना यामुळे फटका बसला होता. त्यामुळे आता धोका दर्शविणारी ब्ल्यू व रेड लाईन मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button