
पैशासाठी नागरीकांना फसवणाऱ्या या नगरसेवकांची नावे लवकरच जाहीर करून त्यांचे पितळ उघडू पाडू -रमेशराव कदम
चिपळूण नगरपालिकेतील एरवी इतर कामांत नाटकी विरोध करून लोकांची दिशाभूल करणारे काही ठराविक आणि मोजके नगरसेवकांनी रिंग सेटलमेंट करण्यासाठी दोन दोन बैठका केल्या. पैशासाठी नागरीकांना फसवणाऱ्या या नगरसेवकांची नावे लवकरच जाहिर करून त्यांचे पितळ उघडू पाडू असा सणसणीत इशारा माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते रमेशराव कदम यांनी दिला आहे.
या सेटलबाज नगरसेवकांची छोट्या व मोठ्या ठेकेदारांबरोबर बैठक झाली. या वेगवेगळ्या झालेल्या बैठकीत दोन्ही गटांकडून १५ टक्केची मागणी करण्यात आली अशी आपली माहिती आहे असा आरोप करून रमेश कदम यांनी केला हा सर्व प्रकार हिणकस आहे. नगरपालिकेची टक्केवारीचे मार्केट करणाऱ्या व नागरिकांना काही गोष्टींवर विरोधाचा दिखावा करायचा अशी नाटके सुरू आहेत. पण नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या सर्व नगरसेवकांचा डबल चेहरा लोकांसमोर आणणार आहोत त्यांची नावं जाहीर करून पंचनामा करू असा इशारा रमेशराव कदम यांनी दिला आहे
www.konkantoday.com