खाजगी फोन कंपन्यांशी स्पर्धा करणारी बीएसएनएल बॅकफूटवर
एकीकडे खाजगी फोन कंपन्या ग्राहकांना विविध सवलतींचा वर्षाव करत असताना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरकारच्या बीएसएनएल कंपनीला नाके नऊ होत आहेत तरी देखील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलकडून नवनवीन प्लॅन आणले जात आहे परंतु नेटवर्कचा अभाव व चांगली सर्व्हिस नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे जात आहेत त्यातच आता बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा रद्द केली आहे बीएसएनएलच्या या निर्णयामुळे आता अनलिमिटेड कॉलिंग ऐवजी दोनशे पन्नास मिनिटे कॉलिंग करता येणार आहे त्यानंतर ग्राहकाला प्रत्येक सेकंदाचा पैसे मोजावे लागणार आहेत या निर्णयामुळे बीएसएनएलला ग्राहकांच्या मोठय़ा नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे.
www.konkantoday.com