
कोकणात आणखी तीन दिवस अतिवृष्टी
गेले काही दिवस होणार्या अतिवृष्टीमुळे कोकणात विविध भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हवामान खात्याने कोकण व गोवा भागात आणखी तीन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कोकणवासीयांच्या समस्येत भर पडणार आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com