
आंबा घाटात एकेरी वाहतूक सुरू होणार
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातून उद्या एकेरी वाहतूक सुरू होणार आहे असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले .आंबा घाट येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे.महामार्गावरील अवजड वाहनांना साखरपा चेक पोस्ट येथे थांबवण्यात आले आहे.परंतु आता जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व उपाययोजना करून या मार्गावरील एकेरी वाहतूक उद्या दिवसा सुरू करणार असल्याचे समजते.त्याचप्रमाणे आज या मार्गावरून अत्यावश्यक सेवा जसे अॅम्ब्युलन्स यांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.तसेच दिवसा एकेरी मार्गाने अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यात येईल. त्यामुळे रत्नागिरी शहरात निर्माण झालेली दूध टंचाई तसेच भाजीपाला टंचाई संपण्याचे संकेत आहेत.पेट्रोल-डिझेल सुद्धा उद्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com