
नांदेड मध्ये व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली.
देशात आणि राज्यात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय मतांची व्हीव्हीपॅटशी जुळवणी होते काय?याची तपासणी केली असता लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५ मतदान केंद्रांवरील मतमोजणी बिनचूक निघाली असून त्यात एकाही मताचा फरक नसल्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली असून सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांवरही एकाही मताचा फरक आढळला नाही. या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून झाली.