
सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीमध्ये निधन.हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते.वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मंगळवारी (आज) रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.एक चांगल्या वक्ता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.परराष्ट्रमंत्री म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले होते.