रिक्षा चालकांना सीएनजी बसविण्यासाठी आमदार राजन साळवी यांचा पुढाकार

रत्नागिरी ः सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषण वाढत असल्याने शासनाकडून सीएनजी गॅस वापरण्यासाठी वाहनचालकांना प्रवृत्त केले जात आहे. सध्या रत्नागिरीत अशोक गॅस कंपनीच्यावतीने रिक्षा चालकांसाठीही सीएनजी गॅसकीट उपब्ध करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली आहे.
सीएनजी कीट बसवणार्‍या रिक्षासाठी कीट बसविल्यावर ६ हजार रुपयांचे कुपन दिले असू त्यामध्ये १०० किलो गॅस दिला जाणार असून रिक्षा चालकांना त्यातून ४ हजार कि.मी. चा प्रवास मोफत पडणार आहे. याशिवाय रिक्षाचालकांसाठी कंपनीने अन्य योजनाही आखल्या आहेत. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने सीएनजीसारखा पर्याय रिक्षाचालकांना परवडू शकतो. त्यामुळे रिक्षा चालकांना रिक्षामध्ये कीट बसवून घेण्यासाठी जय महाराष्ट्र नागरिक सहकारी पतपेढीच्यावतीने कर्जपुरवठा करण्याची घोषणा त्यांनी यावेळ केली. या कार्यक्रमाला योजनेचे समन्वयक रोहीत वाघ, पीआरओ माणिकजरा चिटणीस, सरदार पडवळ, आर्किटेक विभागाचे प्रविर मल्होत्रा, सिद्धेश भाटकर, संजय परदेशी, संजय नांदलसकर, तसेच नाशिक कार्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button