
चालक-वाहकांची व्यवस्था करणार्यांचा सत्कार
राज्य परिवहन रत्नागिरी आगाराच्या रात्र वस्तीला जाणार्या चालक-वाहकांसाठी मागील सुमारे २५ वर्षे विश्रांतीची व्यवस्था, त्या सोबत चहा-पानाची व्यवस्था करणार्या व्यक्ती, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी आगारातील चालक-वाहकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्य परिवहन रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरील प्रमाणे विनामुल्य सेवा पुरविणार्या सुमारे ७० ते ७५ सरपंच व सन्माननीय व्यक्तींचा भेटवस्तू देवून, गौरव करण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य असून अनुकरणीय आहे, असे मंत्री महोदयांनी आपल्या मनोगतात व्यक्त करतानाच चालक-वाहकांचा ग्रामीण जनतेशी असलेला स्नेह व जुळलेलं नातं यामुळेच हे शक्य असल्याचा उल्लेख केला. सर्वच चालक-वाहकांनी प्रवासी जनतेस विनातक्रार सेवा देण्याचे आवाहन केले. www.konkantoday.com