महा जनादेश यात्रा स्थगित करून मुख्यमंत्री मुंबईत,पूर परिस्थितीचा आढावा घेणार
गेल्या आठवड्यात अमरावतीपासून सुरु झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. यासोबत महाराष्ट्राला या संकटाचा सामना करात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. ही बैठक मुंबईत होणार आहे.