नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर झाल्याने समर्थकांमध्ये आनंद
खेड येथील जगबुडी नदीच्या पुलाच्या जोड रस्त्याच्या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. खेडेकर यांचे सहकारी विश्वास मुधोळे यांनाही जामीन मंजूर झाला असून प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता झाली आहे.
त्यांच्यावतीने अॅड. अशोक मुंदरगी, अॅड. प्रमोद बेलोसे, अॅड. अश्विन भोसले यांनी काम पाहिले.
खेडेकर यांची जामिनावर मुक्तता झाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला.
www.konkantoday.com