चिपळूण खेडमध्ये पुन्हा मुसळधार पाउस,सर्वत्र पाणी
उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे.खेड परिसरात मुसळधार पाऊस अजुनही सुरुच आहे.जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खेड बाजारपेठेत बाजारपेठेत पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील गांधी चौक, सफा मस्जिद, वाल्की गल्ली, निवाचा चौक या ठिकाणी खुप पाणी भरण्यास सुरुवात.चिपळूणात देखील अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. सलग आठव्यांदा बाजारपेठ पाणी शिरले. वाशिष्ठी पुल वाहतूकीसाठी बंद. मुंबई – गोवा हायवे ठप्प.खेर्डित पाणी भरल्याने चिपळूण – कराड देखील बंद झाला आहे.
www.konkantoday.com